आम्ही कोण ?

स्वागतम्

बाबावाक्यम् च्या ” शब्द ” या संकेतस्थळावर तुम्ही विविध साहित्यकृती वाचू शकाल. मी आणि माझे स्नेही यांनी स्वतःचे विचार व्यक्त करण्याचं आणि कलाकृती सादर करण्याचं हे ठिकाण. तुम्हाला तुमचे विचार आणि कलाकृती इथे सादर करायची असेल तर आमच्याशी prasadEmail या ठिकाणी संपर्क साधा. साहित्या शिवाय आमचे इतर उपक्रम असे आहेत….


विज्ञान केंद्र

आजूबाजू्च्या लोकांना आणि मुख्यतः मुलामुलींना विज्ञानाची गोडी लागावी यासाठीचा हा उपक्रम आहे. पूर्वी “विज्ञानदूत” हे मासिक आम्ही चालवत होतो. त्याचे मागील काही अंक डाउनलोडसाठी इथे उपलब्ध आहेत.

साधारण पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा “विज्ञानदूत” या नियतकालिकाचे पुनरागमन होत आहे.  त्या आधी छापील रंगित स्वरूपात विज्ञानदूत उपलब्ध होता. त्यातील काही जुने अंक डाउनलोड साठी उपलब्ध आहेत. या पुढील सर्व अंक इ-स्वरूपात मिळतील.


परसातील बाग

घराच्या आजूबाजूला असलेल्या सुमारे ८ गुंठे जागेत आम्ही विविध भाजी, फळे व फुले लावत असतो. निसर्गाच्या सहवासातले क्षण मिळवावेत आणि निर्मितीचा आनंद उपभोगावा हे या मागचे उद्देश आहेत. त्या शिवाय घरच्या भाजी, फळांची चव काही औरच. आम्ही हे काम करताना रासायनिक खते औषधे यांचा वापर करत नाही. जास्तित जास्त गोष्टींचा पुनर्वापर करतो. ८ गुंठे जागेत दोन माणसांच्या श्रमाने काय काय साध्य होईल हे समजून घेण्याचा हा प्रयोग आहे असंही म्हणता येईल. लौकरच बागकामाची आवड असणाऱ्या व्यक्तींना एकत्र आणून बगीचा मंडळ चालू करणार आहोत.

एकमेकां साहाय्य करू | अवघे धरू सुपंथ ||


तंत्रज्ञान प्रशिक्षण

प्रसाद अभियंता आहे. इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि मायक्रोकंट्रोलर हे त्याचे विषय. गेली ३४ वर्षं या क्षेत्रात काम केल्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इंटरनेट वर टेक्नो इ स्कूल च्या माध्यमातून त्याचे हे काम चालते

प्रसाद मुक्त संगणक प्रणालीचा (Free Software) पुरस्कर्ताआहे. याच तत्वज्ञानाच्या धर्तीवर मुक्त इलेक्ट्रॉनिक प्रकल्पांची निर्मिती तो करत राहतो.